Breaking | मूर्तिजापूर बायपासवर भीषण अपघात…

मूर्तिजापूर – राष्ट्रीय महामार्ग नं ६ वर व्यास ढाब्या जवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ला दुसर्या ट्रकने समोरासमोर धडक दिली असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे,यातील ट्रक चालकाला गंभीर मार लागला असून त्यांना मूर्तिजापूर रुग्णालयात दाखल केले आहे.

मूर्तिजापूर बायपास व्यास यांच्या धाब्याजवळ दोन्ही ट्रक आपसात भिडल्याने भीषण अपघात झाला आहे, रात्री ९ च्या दरम्यान हा अपघात झाला सदर घटनेची माहिती शहर पोलिसांनी टीम ला दिली.

त्यामध्ये एक ट्रक चालक आपला ट्रक सोडून पसार झाला आहे. व दुसऱ्या ट्रक मधील अब्दुल जमीर व पियुष बरलोटा राहणार दारवहा हे दोघं जखमी आहे त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे उपचारासाठी आणण्यात आले

यावेळी वंदेमातरम आपत्कालीन पथक चे संचालक दीपक भाऊ सगेले अध्यक्ष सेनापती भाऊ, सचिव विक्की गावंडे, रितेश चींनपपा, सागर वांदे मो. रीहान, शुभम शिंगारे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here