Breaking | राज्यसभेत गोंधळ घातलेल्या ८ खासदारांना सभापतीने केले निलंबित…

न्यूज डेस्क – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. राज्यसभेत आज विरोधी पक्षातील खासदारांच्या गदारोळाचा मुद्दा उपस्थित केला गेला. नाराज असलेले सभापती व्यंकय्या नायडू यांनी ८ खासदारांवर कारवाई केली आहे.

त्याचबरोबर विरोधी पक्ष खासदारांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. काल राज्यसभेत कृषी संबंधित दोन विधेयके मंजूर करताना विरोधी खासदारांनी गदारोळ निर्माण केला. टीएमसीच्या खासदाराने नियम पुस्तक फाडले. बाजूचे माइकही तोडल्या गेलेत. खासदारांच्या या कृतीवर अध्यक्ष संतापले असल्याने कारवाई केल्या गेली.

रविवारी राज्यसभेत कृषी संबंधित दोन बिले मंजूर करताना विरोधी खासदारांनी जोरदार गदारोळ केला. यावेळी टीएमसीचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी नियम पुस्तिका फाडली. डेरेकने आरोप केले की उपसभापतींनी विधेयकावर मतदानाची आमची मागणी मान्य केली नाही. संसदीय इतिहासाचा काळा दिवस असल्याचे वर्णन करताना डेरेक म्हणाले की राज्यघटनेने खासदारांना दिलेला अधिकार आज सभागृहात खेचला गेला.

गोंधळ घातलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित अधिवेशनासाठी 8 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, रिपुन बोरा, नजीर हुसेन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव, डोला सेन हे निलंबित केले जाणारे खासदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here