Breaking | यवतमाळात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु…९० जण नव्याने पॉझिटिव्ह…६१ जणांची कोरोनावर मात…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यात गत 24 तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 68, 85 आणि 89 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 50 वर्षीय तर पुसद येथील 90 वर्षीय पुरुष आणि नांदेड जिल्ह्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 619 रिपोर्ट प्राप्त झाले.

यापैकी 90 नव्याने पॉझेटिव्ह तर 529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 502 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9464 झाली आहे. रविवारी 61 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8505 आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 303 मृत्युची नोंद आहे.यवतमाळ जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 85164 नमुने पाठविले असून यापैकी 84474 प्राप्त तर 690 अप्राप्त आहेत. तसेच 75010 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here