सचिन येवले यवतमाळ
यवतमाळ : पंधरा दिवसापासून सातत्याने चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर धामणगाव देव येथेही दर्शन घेतले. तेथून ताफ्यासह यवतमाळ शहरात येत असताना
मृत पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चासह महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला.

भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.