Breaking | १७ ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत…जाणून घ्या

न्यूज डेस्क – राज्यात नुकत्याच शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या GR ला राज्य सरकाने स्थगिती दिली आहे. येत्या १७ ऑगस्ट पासून राज्यात शाळा सुरु होणार होत्या मात्र राज्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जेथे कमी असेल त्या ठिकाणी शाळा सुरू करणं शक्य आहे, त्या भागांत शाळा सुरू करण्याचा मतप्रवाह होता आणि त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र, आता या जीआरला राज्य सरकारनेच स्थगिती दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे आणि त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असा प्रवाह काही मंत्र्यांमध्ये दिसून येत आहे. टास्क फोर्सच्या बैठकीतही शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

१७ ऑगस्ट पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here