Breaking | आंबेडकरी चळवळीचे नेते व समाजक्रांती आघाडीचे संस्थापक प्रा.मुकुंद खैरे यांचे निधन…

मूर्तिजापूर – आंबेडकरी चळवळीचे नेते तसेच समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे निधन याच आठवड्यात त्यांची मुलगी ऍड.कु.शताब्दी खैरे, व पत्नी यांचे निधन झाले होते. यांच्यावर अकोल्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आज सकाळी ९:३० वाजता दुखःद निधन झाले.

ते दोन आठवड्यापासून अकोल्याच्या रुग्णालयात उपचार घेत होते. आंबेडकरी चळवळीतील मोठा नेता सर्वांना सोडून निघून गेल्याने सर्वाना धक्काच बसला आहे. भारतीय राज्य घटनेचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.

मुर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालय समाजशास्त्र विभाग प्रमुख होते. त्यांनी विद्यार्थी, भुमिहीन, शेतमजूर, आदिवासी, अतिक्रमण धारक इ साठी सामाजिक व न्यायलयीन लढे दिले, मागील आठवड्यात त्यांचे पत्नी छायाताई खैरे,तिनदिवसापूरर्वी मुलगी अँड शताब्दी खैरे आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. कोरोनाने अवघा परिवार एकाच आठवड्यात संपून टाकल्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here