Breaking | १३ व्या दिवशी ही पेट्रोल,डीझेलची दरवाढ सुरूच…

डेस्क न्यूज – कोरोना पार्श्वभूमीवरही पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका लोकांना सतत बसतच आहे. किंमतींमध्ये वाढ सलग १३ व्या दिवशीही राहिली आणि शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेल महागले.

दिल्लीत पेट्रोल आता ७८.३७ रुपये तर डिझेल ७७.०६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

आठवड्याच्या पाचव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत ०.५६ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत ०.६३ रुपयांची वाढ झाली आहे.

यापूर्वी गुरुवारी पेट्रोल ०.३३ रुपयांनी महागले होते, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ०.६४ रुपयांनी वाढ झाली होती.

आता दिल्लीत पेट्रोलची किंमत ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. आज ते ७८.३७ रुपये आहे तर डिझेल ७७.०६रुपये प्रतिलिटरवर आले आहे.

सलग १३ दिवसांच्या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ७.११ रुपयांनी महाग झाले आहे आणि डिझेलच्या दरातही ७.०० रुपयांनी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here