Breaking | यवतमाळ जिल्ह्यात ८ पॉझेटिव्ह रुग्णांची भर…तिघांना मिळाला डिस्चार्ज…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 02 : जिल्ह्यात आज दि. 2 दिवसभरात 8 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या तीन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63 झाली आहे.


गुरुवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या आठ जणांमध्ये सहा पुरूष तर दोन महिला आहे. यात यवतमाळ शहरातील दोन पुरूष, दारव्हा येथील दोन पुरूष, पुसद येथील दोन पुरूष, दिग्रस येथील एक महिला आणि आर्णी येथील एका महिलेचा समावेष आहे.


जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 298 वर पोहचली आहे. यापैकी तब्बल 226 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डात सद्यस्थितीत 85 जण भरती आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 42 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 5149 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असून यापैकी 4952 प्राप्त तर 197 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4654 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here