Breaking | यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यु…पाच जणांना मिळाला डिस्चार्ज…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 21 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका रुग्णाचा (वय 64 वर्षे) रविवारी मृत्यु झाला. त्यांना सारीची लक्षणे होती. त्यामुळे जिल्ह्यात एकूण आठ मृत्यु झाले आहेत.

तसेच भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 56 आहे. यापैकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 28 जण भरती असून इतर लोक तालुका स्तरावरील कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 225 झाले असून यापैकी तर 161 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ जणांच्या मृत्युची नोंद आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 75 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 3527 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3397 प्राप्त तर 130 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3172 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here