Breaking | मूर्तिजापुर| अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले…१ जागीच ठार तर १ गंभीर…

नरेंद्र खवले

मूर्तिजापुर ते दर्यापूर रोडवर सिरसो नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सिरसो येथील १ युवक जागीच ठार तर १ युवक गंभीर जखमी सदर दोन्ही युवक सिरसो येथील रहिवाशी असून जखमी युवकाला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

आज दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान मूर्तिजापुर ते दर्यापूर रोडवर सिरसो जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले असून यात एकाचा मृत्यू झाला असून मृतकाचे आकाश विनायकराव मालधुरे वय 28 वर्ष व त्यासोबत असलेला बंटी विनायकराव मालधुरे हा गंभीर जखमी आहे.

हे दोघ भाऊ आपल्या दुचाकी ने अकोटला जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत हा अपघात घडला यात आकाश विनायकराव मालधुरे वय 28 वर्ष हा जागीच ठार झाला आहे तर बंटी विनायकराव मालधुरे वय 24 वर्ष जखमी असल्या मुळे त्याला अकोला येथे पाठवण्यात आले आहे.ही माहिती वंदे मातरम आपत्कालीन पथक चे अध्यक्ष पांडुरंग संगिले व सेनापती भाऊने आमच्या प्रतिनिधीला दिली. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here