Breaking | मूर्तिजापूर | कोरोनाची पुन्हा एन्ट्री…एक महिला पॉझीटीव्ह आढळली…

मूर्तिजापूर,ता.२७ : नुकत्याच आठवड्यात कोरोना मुक्त झालेला मूर्तिजापूर तालुका पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाल्याने आणखी चिंतेचा विषय झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूरची एक महिला पॉझीटीव्ह आढळली असून या तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या ९ वर पोचली आहे.

अगोदरच काही दिवसांतच नियंत्रणा बाहेर असलेला कोरोना अकोला शहरात झपाट्याने वाढू लागला. सोबतच कोरोनाबाधितांच्या दगावण्याचे प्रमाणही वाढले. कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यूच्या प्रमाणात अकोला जिल्हा विदर्भात ‘टॉप’वर पोहोचला आहे.

त्याचीच खबरदारी म्हणून मूर्तिजापूर शहरात प्रशासकीय यंत्रणा मोठी सक्रीय होऊन मूर्तिजापूर शहर कोरोना मुक्त केलय,मात्र शहराच्या शेजारी असलेल्या हिरपूर गावात एक पॉझिटिव्ह आढळल्याने आता शहराची सुद्धा चिंता वाढलीय…

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील हि महिला एका नातेवाईकाकडील विवाह सोहळ्यात उपस्थिती देऊन परतल्यानंतर या महिलेचा स्वब दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सदर महिलेचा स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर महिलेला मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

तर रुग्णाच्या घराजवळील सदर परिसर कंटेनमेंट झोन आणि सिलिंग ची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू असल्याची माहिती मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांनी सोशल दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here