Breaking | मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांच्या गाडीला अपघात…

अमरावती – मराठी बिग बॉस 2019 सिजन 2 चा विजेता अमरावती रहिवासी शिव ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे, सुदैवाने शिव ठाकरे वाचले त्यांना किरकोळ मार लागला असून सोबत असलेल्या परिवारातील सदस्यांना किरकोळ मार लागला आहे. अमरावती ते अचलपूर रोडवरील वलगाव गावाजवळची आज सकाळी 10,30 वाजताची घटना…

मराठी बिग बॉस विजेता अमरावतीचा लाडका शिव ठाकरे हे अमरावती वरून अचलपूर कडे जातांना वलगाव च्या समोर यांच्या गाडीला अपघात झाला असून, त्यांच्या कारला मागून MH12 KQ 0488 या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलर ने धडक दिली असता शिव ठाकरे यांची कार थेट शेतात पोहचली, सुदैवाने शिव ठाकरे बचावले असून सोबतच असलेल्या आई व बहिणीला किरकोळ मार लागला, मात्र गाडीचा मागील भाग चकनाचूर झाला आहे.

शिव ठाकरे यांच्या अपघाताची वार्ता पसरताच अनेक चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here