Breaking | IPL 2021 खेळाडूंना लागण झाल्यानंतर आयपीएल स्थगित…

न्यूज डेस्क – इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगाम सुरु झाल्यापासून अनेक अडचणी येत असतांना आता इंडियन प्रीमियर लीगची 14 वा सीजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजचा सामना आयपीएल पुढे ढकलण्यात आला आहे. उर्वरित निर्णय पुढील आठवड्यात होईल.

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना काल सोमवारी 3 मे रोजी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यासाठी तहकूब झाल्याचे वृत्त आहे.

मंगळवारी संध्याकाळच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक वृध्दिमान साहाची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटलचा गोलंदाज अमित मिश्रा यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here