Breaking | यवतमाळ जिल्ह्यात आज ३० कोरोना रुग्णांची भर…बरे झालेल्या ६१ जणांना सुट्टी…

Corona's havoc in Nagpur ... Addition of 340 new patients

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 2 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 61 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. 2) नव्याने 30 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.


रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 22 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. यात नेर शहरातील 12 पुरुष व चार महिला, उमरखेड शहरातील 10 पुरुष व तीन महिला आणि वणी शहरातील एक महिला पॉझेटिव्ह आली आहे.


जिल्ह्यात शनिवारपर्यंत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी 30 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 455 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 61 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 394 आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1145 झाली आहे. यापैकी 722 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 29 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 224 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 19008 नमुने पाठविले असून यापैकी 15148 प्राप्त तर 3860 अप्राप्त आहेत. तसेच 14003 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here