नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी विवेकानंद नगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील मजुराने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शरहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे वास्तव्यास असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील मजूर वसंत माधवराव पोटजाळे वय (58)याने आपली पत्नी ज्योती वय (30) हिच्या चारित्र्यवर संशय घेऊन तिची हत्या केल्याची घटना दि 24 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. भाग्यनगर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.