Breaking | जिम आणि सलून सुरु होणार…मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय

मुंबई – राज्यात लॉकडाऊनमुळे गेल्या ३ महिन्यापासून बंद असलेल्या जिम आणि सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी निर्णय घेण्यात आला आहे. येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून जिम आणि सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सरकारनं काही नियम शिथिल केले होते. नियम व अटींवर काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायाला सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. 

लॉकडाऊनमुळे आलेल्या अर्थिक संकटामुळे राज्यात आतापर्यंत 5 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाभिक समाजाचे  सोमनाथ काशिद यांनी केला होता.

एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी सरकारला केला होता. मात्र, सरकार सकारात्मक भूमिका घेत नसल्याचं दिसताना नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here