Breaking | रायपूर स्टेशनवर ट्रेनमध्येच ग्रेनेड स्फोट…4 CRPF चे जवान जखमी…

छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावर सीआरपीएफच्या विशेष ट्रेनमध्ये स्फोट झाला, त्यात चार जवान जखमी झाले. रायपूर पोलिसांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनवर सीआरपीएफ स्पेशल ट्रेनच्या बोगीमधील उप्पर बर्थवर असलेल्या इग्निटर सेट (वन वे ग्रेनेड) असलेला बॉक्स पडल्यावर झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले. डेटोनेटर बॉक्समध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ही घटना सकाळी 6.30 वाजता घडली जेव्हा झारसुगुडा ते जम्मू तवी ट्रेन फलाटावर उभी होती. एक CRPF जवान (एक हेड कॉन्स्टेबल) रायपूरच्या नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here