Breaking | यवतमाळकरांसाठी दिलासादायक बातमी…दिवसभरात पॉझेटिव्ह रुग्णामध्ये वाढ नाही…जिल्ह्यात ११८ रिपोर्ट निगेटिव्ह

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 25 : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांनाच गुरुवारी मात्र दिवसभरात एकाही पॉझेटिव्ह रुग्णाची भर पडली नाही. ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णाचा आकडा 72 वर स्थिरावला आहे.


वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 80 जण भरती आहे. तसेच गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 128 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 रिपोर्ट निगेटिव्ह तर 10 नमुन्यांचे अचून निदान न झाल्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली आहे.

यात 72 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4260 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4135 प्राप्त तर 125 अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकूण 3877 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे.


जिल्हाधिकारी रोज विविध तालुक्यात फिल्डवर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्याच्या इतर तालुक्यात झाल्यामुळे व येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे रोज विविध तालुक्यांचा तसेच ग्रामीण भागाचा दौरा करून प्रत्यक्ष आढावा घेत आहे. गत तीन चार दिवसांपासून त्यांनी नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद येथील प्रतिबंधित क्षेत्राचा ऑनफिल्ड आढावा घेतला. तर गुरुवारी ते वणीत दाखल झाले.


वणी शहरातील महावीर भवन व जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राला त्यांनी भेट दिली. महावीर भवन येथे 247 कुटुंब असून येथील लोकसंख्या 953 आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम येथे कार्यरत आहे. तर जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथे घरांची संख्या 90 आहे. येथील 350 लोकसंख्येसाठी चार टीम कार्यरत आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर तपासणी करावी.

तसेच या भागातून आणखी नमुने तपासणीकरीता पाठवावे. पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यन सारीची तसेच आयएलआयची लक्षणे असलेले नागरिक आढळल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती द्या. तसेच सारी आणि आयएलआयची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.


सर्व नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

1 COMMENT

  1. Yavatmal shahratil kachryache nirmulan,swachhata va ghaniche samraj ahe hya baddal mahavoice aapli bhumika spasht kadhi karnar.gandhi chouk yethil jivraj furniture hya dukana samor .ghaniche samrajya aste yethil nagrik trast aahet ,kacharagadi yet Nahi,kachara uchalnare,Malta kadhanare yet Nahi Nagar parishdeche laxsh Nahi .vadhtya Corona mule kachryache nirmulan hone atyant avashyak garaj ahe.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here