Breaking | गडचिरोली | परराज्यातील व इतर जिल्हयातून आलेले २३ व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह…

सर्व रूग्णांच्या नोंदी त्यांच्या स्वजिल्हयात होणार,गडचिरोली जिल्हयातील बाधित संख्या सद्या तरी 73

गडचिरोली:
जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती भंडारा जिल्हयातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता.

यातील सर्व 23 ही व्यक्ती पुरूष आहेत. सर्वांना जिल्हयात आल्यानंतर यामध्ये सीआरपीएफला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील एका व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३च राहणार आहे.

सदर रुग्णांच्या नोंदी पोर्टल वर सायंकाळपर्यंत राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

यानुसार जिल्हयातील एकुण कोरोना बाधित – 73

▪️सद्या जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित 13

▪️आत्तापर्यंत जिल्हयातील कोरोनामुक्त – 59

▪️इतर राज्य व जिल्हयातील उपचार सुरु असलेले – 24 (2 जून रोजी 1 व आजचे 23)

एकुण 23 कोरोना बाधितांचे ठिकाण व संख्या
पश्चिम बंगाल -10, उत्तर प्रदेश-2, कर्नाटक -2, ओरीसा-2, झारखंड -1, बिहार -1, अकोला -1, नांदेड -2, चंद्रपूर -1 आणि भंडारा -1

सीआरपीएफचे 23 जवान सुट्टीवर होते ते नागपूर वरून 27 जून ला जिल्हयात आले. स्वजिल्हयातून व राज्यातून लॉकडाउन संपल्यावर नागपूर येथे आले होते व सर्व जण सीआरपीएफच्या बसने जिल्हयात संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. यातील 23 पैकी 18 पॉझिटीव्ह आढळले तर 5 निगेटीव्ह आले आहेत.

तसेच 4 इतर जवान खाजगी वाहनाने इतर जिल्ह्यातून जिल्हयात आले. त्यांचेही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यानुसार 23 पैकी 18 व चार पैकी 4 असे 22 सीआरपीएफ जवान काल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here