Breaking | आजही यवतमाळ जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु…१३८ नव्याने पॉझिटिव्ह…

blue arrow abstract technology background, bright speed abstract backdrop, glowing line abstract template, vector illustration

102 जणांना रुग्णालयातून सुट्टी

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत असून मृत्युंची संख्यासुध्दा वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आज (दि. 5) जिल्ह्यातील सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला तर नव्याने 138 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 102 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

गत 24 तासात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 58 वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील 60 आणि 47 वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील 53 वर्षीय पुरुष, वणी शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 138 जणांमध्ये 77 पुरुष व 61 महिला आहेत.

यात दिग्रस शहरातील तीन पुरुष व तीन महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील 20 पुरुष व 14 महिला, पुसद शहरातील 10 पुरुष व 16 महिला, पुसद तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील 17 पुरुष व आठ महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व सात महिला,

घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 741 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 265 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4063 झाली आहे.

यापैकी 2941 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 115 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 230 जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 180 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 54742 नमुने पाठविले असून यापैकी 51216 प्राप्त तर 3526 अप्राप्त आहेत. तसेच 47153 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here