Breaking | भूकंपाचे धक्के अकोल्यात नव्हे तर हिंगोलीत जिल्ह्यात…

डेस्क न्यूज – हिंगोली जिल्ह्यात आज सायंकाळी दरम्यान कळमनुरी तालुक्यातील गव्हाण बोल्डा,वाडी पांगरा शिंदे या ठिकाणी या आज दुपारी ५.२८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तीव्रता ३.३ रिक्टर स्केल एवढी असल्याने कुठलेही वित्तहानी,जीवित हानी झाली नाही. मात्र सदर भूकंप हा अकोला शहरात झाल्याची बातमी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

अकोला शहराच्या पासून दक्षिण दिशेला १२९ की मी क्षेत्रात भूकंपाचे झटके आले त्याची तीव्रता ३.३ रीच्टर स्के ल एवढी होती , या कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटक्या मुळे कोणतीही जीवित किंवा मोठी हानी झालेली नाही , राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राने या घटनेची पुष्टी केली आहे.

अकोल्यापासून दक्षिणेस 129 कि.मी. अंतरावर अर्थात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे भुकंपाचा धक्का आज बसला. पण, राष्ट्रीय भुकंप विज्ञान केंद्राने अकोल्यापासून दक्षिणेस उल्लेख केल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण होते.


अकोल्याच्या दक्षिणेस 129 कि.मी. अंतरावर रिश्टर स्केल 3.3 तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला आहे. आज सायंकाळी 5.28 मिनिटांनी यांची नोंद राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्रात घेण्यात आली आहे.

दरम्यान, हे केंद्र वाशीम व हिंगोली यांच्या मध्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी होती. तर हिंगोली मध्ये मध्यंतरी जमीनीतून आवाज येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here