Breaking | अकोल्यातही संचारबंदी लागू…असा आहे आदेश…

अमरावती हिंसाचार्यांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातही संचारबंदीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी दि १७/११/२०२१ रोजी दिलेल्या पत्रानुसार अमरावती शहरात त्रिपुरा घटने संदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन संचारबंदी लागु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने अकोला शाहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात सूचित केले आहे.

त्याअर्थी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दि. १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १९/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम-१४४ अंतर्गत खालील प्रमाणे जमावबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात येत आहेत.

A) सकाळी ०६.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. सदर जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार कींवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतीबंध राहील. तसेच विधानपरिषद निवडणुक संदर्भात नामनिर्देशन पत्र दाखल करणे याबाबत सुट राहील.

B) संध्याकाळी ०७.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील व शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरु राहतील. सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करुन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा.

अकोटमध्येही शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 आणि 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान,आता पुन्हा 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तर, अकोट शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबरपर्यंत बंदच असणार आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here