Breaking | यवतमाळात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु…कोरोनाबाधित मृत्युची संख्या आठ

सचिन येवले ,यवतमाळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युची संख्या आठ झाली आहे.

सदर व्यक्ती हा मूळचा अकोला येथील असून 14 जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता.

15 जून रोजी त्याला व्हेंटीलेटर लावण्यात आले. मात्र 17 जूनच्या रात्री 1 वाजता त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here