Breaking | यवतमाळात कॉरोनाचा कहर…दोन दिवसांत आठ जणांचा मृत्यु…२०२ नवीन पॉझिटिव्ह…

पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह 205 जणांना सुट्टी

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 2 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 205 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 48 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन दिवसांत 202 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

यात 1 सप्टेंबर रोजी 107 जण पॉझेटिव्ह तर 2 सप्टेंबर रोजी 95 जण पॉझेटिव्ह आले आहेत.48 तासात मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 85 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला आणि 46 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 47 वर्षीय महिला, नेर शहरातील 70 वर्षीय व 64 वर्षीय पुरुष आणि घाटंजी तालुक्यातील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

1 सप्टेंबर रोजी पॉझेटिव्ह आलेल्या 107 जणांमध्ये 72 पुरुष व 35 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 32 पुरुष व 17 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील 13 पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, दारहव्हा शहरातील एक पुरुष, अमरावती येथील एक पुरुष, अकोला येथील एक महिलेचा समावेश आहे.

आज (दि. 2) पॉझेटिव्ह आलेल्या 95 जणांमध्ये 63 पुरुष व 32 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 18 पुरुष व आठ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, बाभूळगाव शहरातील सात पुरुष व एक महिला, नेर शहरातील एक पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष,

महागाव शहरातील 10 पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील पाच पुरुष व चार महिला, वणी शहरातील तीन पुरुष व सहा महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 626 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 216 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3601 झाली आहे. यापैकी 2667 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 92 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 197 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 237 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 51103 नमुने पाठविले असून यापैकी 47842 प्राप्त तर 3261 अप्राप्त आहेत. तसेच 44241 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here