Breaking | यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री…

blue arrow abstract technology background, bright speed abstract backdrop, glowing line abstract template, vector illustration

सचिन येवले ,यवतमाळ

गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतांनाच आता पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे.

नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्तिला दोन – तीन दिवसांपासून ताप आणि खोकला आहे.

तसेच त्याने सुरवातीला खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या व्यक्तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले असून हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या सपंर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे.

तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनावश्यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये. साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here