Breaking | राज्यातील कॉलेजेस ‘या’ तारखेपासून सुरु होणार…तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

न्यूज डेस्क – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताच अनेक राज्यात शाळा, कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय सुरु असून आता राज्यातही लवकरच महाविद्यालये उघडणार असल्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

उदय सामंत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबर पासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आलं असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण झालं असणं महत्त्वाचं आहे. कोरोणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here