हिवरखेड आणि अकोट पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अडगाव आणि बोरव्हां येथे गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे
जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर,एलसीबीचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून सुमारे १२५ किलो गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली
असून या कारवाईत तीन आरोपी असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु असून अंदाजे
या गांजाची किंमत एक करोड रुपये असू शकते .पोलिसांच्या सध्या सुरू असलेल्या कारवाईमुळे याक्षणी अधिक माहिती उपलब्ध नाही.यात दोन आरोपी अटकेत असून यात एक फरार झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली