Breaking | यवतमाळ जिल्ह्यात २४ तासात ३६ पॉझेटिव्ह; ३३ जणांना सुटी…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग आज पुन्हा मंदावत असल्याचे चित्र असून गत 24 तासात 36 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 588 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9089 झाली आहे. रविवारी 33 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8137 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 288 मृत्युची नोंद आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 80831 नमुने पाठविले असून यापैकी 79828 प्राप्त तर 1003 अप्राप्त आहेत. तसेच 70739 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here