Breaking | भंडाराजवळ भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू… दोघे गंभीर जखमी

भंडारा : भरधाव चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अन्य दोन गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा – लाखनी महामार्गावरील शिंगोरी फाट्याजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

या भीषण अपघाताची माहिती कारधा पोलिसांना होतात ठाणेदार श्रीराम लांबाडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराडे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी मृत पावलेल्या दोघांनाही शासकीय रुग्णालय भंडारा येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. तर, अन्य गंभीर दोघांनाही उपचारासाठी भंडारा रुग्णालयात हलविले आहे. यात मृतांमध्ये सांबा आणि मत्ते नामक इसमाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातस्थळावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. अपघात बघणाऱ्या आणि पोलिसांसोबत मदतकार्य करणाऱ्या वन विभागाचे कर्मचारी डेविड मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन भरधाव येत होते. चारचाकी वाहनाने दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातानंतर चारचाकी वाहन फिल्मस्टाईल हवेत उडाली आणि तीन ते चार पलटी खाऊन रस्त्याच्या बाजूला गेली.

त्यानंतर अपघातग्रस्त अनियंत्रित चारचाकी वाहन वेगातच पुन्हा महामार्गावर आले. घटनास्थळी कारधाचे ठाणेदार लांबडे आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कऱ्हाडे उपस्थित असून अधिक तपास करीत आहे. अपघातात मृत आणि जखमींची पूर्ण नावे कळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here