Breaking | भंडारा युवक काँग्रेसने माथनी टोलनाका बंद पाडला…टोलनाका व्यवस्थापनाला दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

भंडारा : नादुरुस्त रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहनधारकांकडून टोलनाका वसूल केल्या जात आहे. त्यामुळे भंडारा युवक काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी माथनी टोलनाक्यावर निदर्शन करून टोलनाका बंद पडून सर्व वाहनांची टोलमुक्ती केली.

युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, भंडारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे, युवक काँग्रेस महासचिव सचिन फाले, तुमसर तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर राऊत, प्रिया खंडारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर निदर्शने करीत टोलनाला बंद पाडला.

टोल नाक्यावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने सुरू करताच मोठी खळबळ उडाली. या आंदोलनाची पूर्वसूचना मौदा पोलिस ठाण्याला मिळाले असल्याने मौद्याचे पोलीस निरीक्षक मधुकर गीते व पोलिस निरीक्षक नितीन आगाशे हे नका परिसरात पोलीस ताफ्यासह बंदोबस्तावर होते. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मात्र, नागपूर ते भंडारा हा ६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी उघडला असल्याने अनेकदा छोटे – मोठे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त केल्या जाणार नाही, तोपर्यंत माथनी टोलनाक्यावरून टोल वसुली करू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाका एजन्सीला दिला.

दरम्यान काही काळासाठी वाहतूक व्यवस्था खोळंबली. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगून आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेत सदर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याचे अभिवचन घेतल्यानंतर संतप्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग खुला केला. या आंदोलनामुळे या टोलनाक्यावरून जाणारे- येणाऱ्या सर्व वाहनांना आता टोलमुक्ती झाल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करत नारेबाजी केली. यावेळी भंडारी युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here