Breaking | यवतमाळ जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह…१७ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये २२ जण भरती

सचिन येवले यवतमाळ

यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17 झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.

सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 22 जण आहे. यात सहा प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.


आज (दि.23) दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून एकूण 1894 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 1887 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत.

सुरवातीपासून आतापर्यंत 1775 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी 96 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे.

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 15 जण तर गृह विलगीकरणात 486 जण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here