Breaking | यवतमाळ जिल्ह्यात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह…एक्टिव पॉझिटिव्हची संख्या ६२…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता आणखी 39 रिपोर्ट प्राप्त झाले आहे. यात दहा जण पॉझेटिव्ह तर 29 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील महिला, नेर येथील दोन महिला, दोन पुरुष आणि एक मुलगा तर दिग्रस येथील चार पुरुष पॉझेटिव्ह आले आहे.

29 निगेटिव्ह रिपोर्टमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 11 रिपोर्ट, दारव्हा येथील 7 आणि नेर येथील 11 रिपोर्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह 225 आहे. यापैकी 156 जणांना सुट्टी देण्यात आली तर सात जणांच्या मृत्युची नोंद आहे.


तसेच दिग्रस येथे नव्याने पॉझेटिव्ह आलेले सर्व चार पुरुष दारव्हा येथील सुरवातीच्या पॉझेटिव्ह महिलेच्या तर नेर येथील सर्व पॉझेटिव्ह सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत.

तसेच वणी येथील रहिवासी असलेले दोन जण नागपूर येथे पॉझेटिव्ह आले आहेत. ते सध्या नागूपर येथेच भरती असून प्रशासनातर्फे त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे, असे प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here