Breaking | अकोल्याची रिकार्डब्रेक आकड्याकडे वाटचाल…पुन्हा ३० पॉझिटीव्ह…एकूण संख्या ४६५ वर…

अकोला – आज बुधवार दि.२७ मे २०२० रोजी सकाळी अहवालानुसार, कोरोना संसर्ग तपासणीचे १८३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५३ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या ४६५ झाली आहे.

आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट,

राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १४८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

प्राप्त अहवाल-१८३
पॉझिटीव्ह-३०
निगेटीव्ह-१५३

अतिरिक्त माहिती

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-४६५
मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-२८९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४८

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

1 COMMENT

  1. अकोला मनपा व जिल्हा मधील कोवीड -19 ची साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. तपासणीचा वेग वाढवणे आवश्यक आहे, शासकीय व्यवस्था मध्ये सुधारणा करणेे व आवश्यक त्या सोई पूरविणे लोकांनी स्वत:च शिस्तीचे पालन करणे. तपासनी पथके व त्यांना सुरक्षा याची व्यवस्था उत्तमोत्तम करावी. साकळी खंडीत करण्यासाठी स्थानीक नागरीक यांचे सहकार्य घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here