Breaking | अकोला शहर कोरोनाच्या विळख्यात…आज २३ पॉझिटीव्ह…लवकरच चवथे शतक पूर्ण करणार !…आता तरी जागे व्हाल का ?…

blue arrow abstract technology background, bright speed abstract backdrop, glowing line abstract template, vector illustration

अकोला – आज शनिवार दि.२३ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार, कोरोना संसर्ग तपासणीचे १५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३० अहवाल निगेटीव्ह तर २३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या ३७८ झाली आहे.

आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या १६ रुग्णांपैकी नऊ महिला व सात पुरुष असून त्यात दोनजण फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर उर्वरित माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखा प्लॉट वाशीम बायपास, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

आज दुपारुन आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. तर अन्य सहा महिलांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्या त दोघी जणी फिरदौस कॉलनी येथील तर अन्य रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.

त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

प्राप्त अहवाल-१५३
पॉझिटीव्ह-२३
निगेटीव्ह-१३०

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३७८
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२११
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३६

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here