Breaking | मुंबईत अविघ्न टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर भीषण आग…अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी

न्यूज डेस्क – मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. तर एक जण जीव वाचविण्यासाठी दुसर्या माळ्यावर चढत असताना एकाचा खाली पडून मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही.

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता.

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here