Breaking | अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग…आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…

फोटो- सौजन्य ANI

न्यूज डेस्क – अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्था ANI दिली असून त्याच बरोबर 10 ते 13 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आगीत जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 20 हून अधिक लोकांना जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here