Breaking | २२ वर्षीय युवकाची निर्घुण हत्या !…अमरावतीच्या महादेवखोरी परिसरातील घटना….

अमरावती शहरात हत्येच सत्र थांबायचं नाव घेत नसून आज पुन्हा एक हत्येने शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून आतापर्यंत तीन ते चार हत्याकांड घडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अमरावतीच्या महादेवखोरी परिसरातील वरूण नगरातील वय अंदाजे २२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या केली असून त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. प्रणय मधुकर सातनुरकर असे मृतक युवकाचे नाव असून शुल्लक वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. तर या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

आज दुपारी ४,३० च्या दरम्यान ची घटना. मारेकर्यांची संख्या दोन तीन युवकांनी हल्ला केल्याचे समजले, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here