Breaking | यवतमाळ जिल्ह्यात १९० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर…तिघांचा मृत्यु…१८ जणांना सुट्टी

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 6 : गत 24 तासात जिल्ह्यात नव्याने 190 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 18 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील 63 वर्षीय पुरुष आणि 56 वर्षीय महिला तर पांढरकवडा शहरातील 62 वर्षीय पुरुष आहे. तसेच गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 190 जणांमध्ये 103 पुरुष व 87 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 30 पुरुष व 23 महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील आठ पुरुष व सात महिला तसेच तालुक्यातील चार पुरुष व नऊ महिला,

पांढरकवडा शहरातील एक पुरुष व तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व नऊ महिला व तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील 10 पुरुष व 10 महिला व तालक्यातील सहा पुरुष व तीन महिला, झरी जामणी शहरातील सहा पुरुष व सहा महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष व एक महिला, आर्णि शहरातील एक महिला व तालुक्यातील दोन पुरुष,

घाटंजी शहरातील पाच पुरुष व तालुक्यातील चार पुरुष व पाच महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष व तीन महिला, महागाव शहरातील 11 पुरुष व पाच महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष आणि बाभुळगाव शहरातील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 184 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4253 झाली आहे. यापैकी 2959 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 118 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 230 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 191 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 55380 नमुने पाठविले असून यापैकी 51812 प्राप्त तर 3568 अप्राप्त आहेत. तसेच 47559 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here