करोनामुळे मुंबईत आज चार जणांचा मृत्यू झाला. मुंबईतली रुग्णसंख्या ४९० वर पोहचली आहे .
करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने मुंबई तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर पोहचली आहे
तर दुसरीकडे आता विदर्भात ही रुग्णांच्या संखेत वाढ होताना दिसत आहे.
कोरोना संसर्गाचा विळखा आता बुलडाणा जिल्ह्यास पडत असून आणखी दोन जणांचे स्वब नमुने पॉझीटीव्ह आले आहेत
यामध्ये बुलडाण्यातील एक व शेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे.
त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.
परिणामी जिल्ह्यात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.