BREAKING | बुलढाणा जिल्ह्यात आणखी तिन जन कोरोना पॉजिटिव्ह…हे तिघेही मरकज या धार्मिक कार्यक्रमावरुन परत आलेल्या पैकी…आता एकुन संख्या आठ…

बुलढाणा

बुलढाण्यात कोरोना रुग्णांची संख्या आता आठ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिक सध्या भयभीत झाले आहेत . दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आता एकूण ८ कोरोना बाधित झाले असून त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. महत्वाची बाब म्हणजे या तीन पैकी एकही बुलडाणा शहरातील नाही… मरकज कार्यक्रदरम्यान दिल्ली येथे गेलेल्या १७ जणांचा जिल्हा पोलीस प्रशासनाने शोध घेतला होता. त्यातील १६ जणांचे स्वाब तपासणीसाठी युद्धस्तरावर नागपूरला पाठविण्यात आले. एक जण १४ दिवसांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेला होता त्यामुळे १६ जणांचेच पाठविले.

काल सकाळी सुरुवातीला १० जणांचे रिपोर्ट मिळालेत. ते निगेटिव्ह आलेत. नंतर आणखी 2 जणांचे निगेटिव्ह मिळाले. उर्वरित चार जणांपैकी ३ मात्र पॉझिटिव्ह आलेत तर एकूण निगेटिव्ह १३ आहेत. हे तीनही कोरोना बाधित बुलडाणा शहरातील नाहीत. एक घाटाखालील तर दोन घाटावरच्या भागातील आहेत. आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ८ झाली आहे.

अशी माहिती जिल्ह्या शल्य चिकित्सक यानी माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here