BREAKING | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर NPR ला स्थगिती…केंद्र सरकारचा मोठा निर्णय

डेस्क न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, म्हणजेच एनपीआर अद्ययावत करण्याची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबविली आहे. १ एप्रिलपासून अनेक राज्यांमध्ये एनपीआर प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा आणि त्याच्या संभाव्य धोका लक्ष्यात घेता गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे .पुढील आदेश येईपर्यंत एनपीआर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

भारतात कोरोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. याची लागण झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे देशावर संकट ओढवले असून नागरिकांना यापासून वाचण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. देशभरात सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी लावण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here