चंद्रपूर :- ब्रह्मपुरी नगरपरिषद क्षेत्रातील चौकाचौकात बॅनर पोस्टर ने जाळे विनले आहे. असा ब्रह्मपुरी शहरातील एक ही चौक नाही. जिथे बॅनर पोस्टर नाही. सार्वजनिक ठिकाणी बॅनर पोस्टर लावले तर नगर परिषदेची पूर्वपरवानगी घेऊनच व त्यामध्ये प्रति दिवस आकारणी फी भरण्याचे मान्य करुनच बॅनर पोस्टर लावण्याची परवानगी दिल्या जातो पण बहुतांश बॅनर पोस्टर हे राजकीय राजकारणी लोकांच्या वाढदिवसाचे किंवा महान कार्य करून तीर मारल्याचे लोकांना दाखवण्यासाठी असतात.
मात्र हे राजकीय राजकारणी लोक खरोखरच बॅनर पोस्टर लावण्याची पूर्वपरवानगी घेत आहेत का ? नियमानुसार फी भरतात का? आणि कायदा न्याय सर्वांसाठी समान आहे. राजकारणी असो की सर्वसाधारण असो हे कोण तपासून घेणार आता हेच पाहणा ब्रह्मपुरी नगर परिषद कार्यालयाच्या भिंतीलाच एक बॅनर लावले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील नगरपंचायती मध्ये सत्ता आल्याबद्दल चा एक बॅनर काही दिवसापासून ठीय्या मांडून आहे. नगरपरिषद ही कुणाच्या मालकीची इमारत नाही. ना किंवा कोणत्या पक्षाची नाही.ना यामुळे हा सत्तेचा माज तर नाही नां ? अशी ब्रह्मपुरी शहरात खमंग चर्चा सुरू आहे.