ब्रह्मपुरी | पारडगाव येथील सरपंचाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर…

चंद्रपूर :- ब्रह्मपुरी अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी संवर्गविकास अधिकार्‍यांना निवेदन..दिवसेंदिवस वारंवार होणारा निसर्गचक्रातील बदल व पर्यावरणाचा समतोल राखाता यावा याकरीता शासनाने झाडे लावा झाडे जगवा मोहीम हाती घेतली आहे त्यातच या मोहिमेअंतर्गत होणारी वृक्षतोड कुठेतरी थांबावी म्हणून ठीक ठिकाणी प्रत्येक सणासुदीच्या दिवसाला पर्यावरण प्रेमी तसेच इतर समाजसेवी संघटनांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जातात.

मात्र याला अपवाद ठरीत ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगांव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाने कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करून चक्क झाडांची कत्तल केल्याचा प्रकार निदर्शनास येताच वृक्षतोड त्वरित थांबवण्यासाठी गावातील नागरिकांच्या वतीने सुधीर ठेंगरी यांनी ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी, सभापती, उपसभापती, यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे

पारडगाव ग्राम पंचायत हद्दीतील सरपंच मनमानीपणा करून कसली शासकीय परवानगी न घेता विनापरवानगी वृक्षतोड वृक्षछाटणी करूण पर्यावरणाला तसेच ग्राम पंचायतला उत्पन्नाला तडा बसत आहे. सुंदर वृक्षछाटणी/तोडणीस ग्रामपंचायत सदस्य कमिटीची कुठलिही रितसर परवाणगी घेण्यात आली नाही अशी माहीती सरपंच वगळून इतर सदस्यांकडुन ऐकायला मिळत आहे. तरी याबाबद महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 अंतर्गत वृक्षतोडा वृक्षछाटणी करणायावर नियमानुसार ‘दखलपात्र गुन्हा (F.I.R) नोंदविला जाऊ शकतो त्या अनुषंगाणे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन उचित कार्यवाही करूण पुढील काळात होणारी अवैध्य वृक्षतोड थांबवावी अशी मागणी परडगाव गावकरी वर्गाकडून करण्यात आली असून यासंदर्भात ब्रह्मपुरी पंचायतीचे सभापती रामलाल दोनाडकर उपसभापती सुनिता ठवकर संवर्ग विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here