माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही PAना अटक…

न्यूज डेस्क – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता मोठ्या अडचणीत येताना दिसत असून देशमुख यांच्या दोन्ही पीएना आज ईडीनं अटक केली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

काल अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी धाडसत्र राबविले होते त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे, या दोघांची वैद्यकीय चाचणी करुन आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. बार मालकांच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here