बोईसर एसटी आगार समस्यांचे माहेरघर, आमदार राजेश पाटील यांची बोईसर आगाराला भेट…

प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमदारांचे आश्वासन…

मनोर – तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कामगार वर्ग बोईसर मध्ये स्थायिक झाला असल्याने बोईसर आगारातून पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

बोईसर आगारात येणारे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि विश्रांती गृह आदी सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आमदार राजेश पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार आमदारांनी शुक्रवारी (ता.20)बोईसर एसटी आगाराला भेट देत आगारातील समस्यांचा आढावा घेतला.

बोईसर आगारामध्ये सुमारे साडे तीनशे चालक वाहक, तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत.सुमारे तेरा एकर क्षेत्र असलेल्या आगारात एसटीतून प्रवास करणारे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सोयींचा वनवा आहे.

पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही, स्वच्छता गृहामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, लांब पल्ल्याच्या वाहक चालकांना विश्रांतीची सोय नाही.त्यामुळे बोईसर आगार समस्यांचे माहेरघर झाले आहे.

आमदार राजेश पाटील यांनी शुक्रवारी बोईसर आगाराला भेट दिल्यानंतर बोईसर आगार व्यवस्थापक संदीप बळीराम शिंदे यांच्यासोबत चर्चा करीत प्रशासकीय बाबी जाणून घेतल्या. तसेच आगारात उपलब्ध सुविधांचा दर्जा सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

आगामी बोईसर आगारातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याने आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्य अनिल रावते,राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर तालुका सरचिटणीस तेजस पवार, बोईसर शहर अध्यक्ष करण चव्हाण, बहुजन विकास आघाडीचे अविनाश चुरी,ऍड नितीन भोईर, रूपेश पाटील आणि बोईसर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here