बोदवड – गोपीचंद सुरवाडे
महावीर ट्रेडर्स नाडगाव रोड बोदवड या बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानातून राजेंद्र प्रभाकर पाटील,रा,हिंगणे ,उमेश पुंडलिक पाटील,रा,आमदगाव, ता,बोदवड या दोन्ही शेतकऱ्यांनी महावीर ट्रेडर्स या दुकानातून किसान, बी – 11 हे भुईमुगाचे वान विकत घेतले असता ते वान शेतात उगले नाही,राजेन्द्र प्रभाकर पाटील रा,हिंगणे यांनी त्यांच्या आईच्या नांवे असलेल्या शेत गट नं17/1 हिंगणे शिवारातील शेतात पेरले आहे.
हेच किसन एस, बी–11भुईमूग चे बियाणे उमेश पुंडलिक पाटील रा आमदगाव यांनी बटाईने केलेल्या शेतात शेतमालक श्रीकृष्ण निळकंठ कोलते यांच्या गट नं44 आमदगाव शिवारातील शेतात पेरले आहे या शेतात सुद्धा किसन एस ,बी –11 हे बियाणे उगले नाही,राजेंद्र प्रभाकर पाटील यांनी याच दुकानातून बाजरीचे बियाणे नेले असता,
ते बियाणे सुद्धा गट नं 12/2 इंदूबाई प्रभाकर पाटील यांच्या शेतात पेरले होते ते बियाणे सुद्धा उगवले नाही ,शेतकऱ्याने केलेला खर्च व मशागत वाया गेली असून मशागतीचा झालेला खर्च देण्यात यावा, कंपनीवर शेतकऱ्याची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा,
दुकानदार चे बियाणे पुरविण्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे, जेणेकरून दुसऱ्या गोरगरीब शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही व कोणत्याही शेतकऱ्यावर गळफास घेणार लागण्याची वेळ येणार नाही असे शेतकरी राजेंद्र प्रभाकर पाटील रा,हिंगणे ,उमेश पुंडलिक पाटील रा ,आमदगाव ता,बोदवड यांनी तहसीलदार बोदवड ,गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.