मूर्तिजापूरात पैदासी पत्रकारांचा सुळसुळाट…जनतेला सावधान राहण्याचे आवाहन

मूर्तिजापूर : पत्रकारीता एक सतीचं वाण असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्याजातो याच आधार स्तंभास आता कीड लागली असून मूर्तिजापूरात पैदासी पत्रकारांची खोप निर्माण होत असल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. येथील काही स्वयंघोषित पत्रकार पैदा झाले आहे. काही तीन चार पत्रकार तर असे पैदा झाले की, येथील अधिकारी व राजकीय व्यक्तींना आपले जीवन जगण्यासाठी व उपजीविका चालविण्यासाठी हातात धरले आहे. त्यांच्या कडून येणाऱ्या बातम्यासांठी पैशाची मागणी केली जाते येणाऱ्या ५०० रुपयातून सर्व पेपरला बातम्या देण्याचा दावा केला जातो.

यात काही चिल्लर स्वयंघोषित पत्रकारांचा समावेश आहे तर काहीं जवळ नावापुरते माध्यम आहे. हे नेहमी आपण खुप मोठा मोठा पत्रकार असल्याच्या अविर्भावात वावरत असतात या पैकी काही चिल्लऱ्यांजवळ पोट भरण्याचे कुठलेही साधन नसताना ना कुठला रोजगार हे आपली उपजीविका कशी भावगीतात हाच संशोधनाचा विषय आहे. यातील काही राजकीय लोकांच्या दिमतीला बांधल्या गेले असल्याने त्यांच्या पाठ थोपटणाऱ्या बातम्यांचा जणू यांनी ठेकाच घेतला आहे.

अलीकडेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा बातम्या प्रकाशित होणे हे यांनी केलेल्या चिरीमिरीचे द्योतक आहे. असल्या पत्रकारापासून समाजाने सजग राहणे गरजेचे आहे. यातील काही एका दारुच्या बाटलीसाठी आपली पत्रकारीता उलटी झोपवित असल्याची माहिती महावाईसच्या हाती लागली आहे.

काहीच्या वर्तमानपत्राचा पत्ता पण नाही तर काहींचे वर्तमानपत्र मूर्तिजापूरात कधीच येत नाही असे पत्रकार समाजाची दिशाभूल करुन केवळ राजकीय लोकांचे पाय चाटण्याचे काम करीत आहेत अशांना जागरुक नागरीकांनी त्यांची जागा दाखवून देण्याचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. हे पत्रकार कोण आहे यापासून नागरिक अनभिज्ञ नाहीत. हे अलीबाबाचे चोर असून अशा चोरट्या पत्रकारापासून सावधान रहावे केवळ एवढेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here