सौंदलगा येथील बेपत्ता शेतकरी मारुती चव्हाण यांचा अखेर सहा दिवसांनी वेदगंगा नदीत सापडला मृतदेह…

राहुल मेस्त्री

सौंदलगा तालुका निपाणी येथील शेतकरी मारुती संतु चव्हाण वर्ष 64 यांचा मृतदेह दिनांक 28 रोजी वेदगंगा नदी पात्रात तरंगत असल्याचे निदर्शनास आल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मयत शेतकरी मारुती दत्तू चव्हाण हे जनावरांना चारा आणण्यासाठी मंगळवार दि.23 रोजी सकाळी 12 वाजता नेहमीप्रमाणे गेले होते.मात्र ते दुपारपर्यंत घरी परतलेच नाही.

म्हणून याबाबत त्यांच्या घरच्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.मात्र तिथे देखील दिसून आले नाहीत, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी मंगळवारी, बुधवारी दिवसभर त्यांचा इतरत्र शोध घेतला. मात्र कुठेच शोध न लागल्याने त्यांचा मुलगा सागर यांनी वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या वर्णनासह गुरुवारी नोंदवली.

त्यामुळे बेपत्ता मारुती संतु चव्हाण यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली रविवारी दिनांक 28 रोजी सकाळच्या दरम्यान वेदगंगा नदी काठी काही शेतकरी शेतकामासाठी गेले असता येथील नवाट म्हणून परिचित असलेल्या नदीकाठी क्षेत्रात पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळल्याचे दिसून आले.

या घटनेची सदर शेतकऱ्यांनी माहिती तात्काळ पोलिसांना दिली .या मृतदेहाची ओळख पटवताना हा मृतदेह बेपत्ता मारुती संतु चव्हाण यांचा आहे असे दिसून आले… त्यानुसार याची सविस्तर माहिती निपाणी ग्रामीण ठाण्यात देण्यात आली.

यावेळी एएसआय कंभार यांनी भेट देऊन पाहणी केली.गावकऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून निपाणीतील शासकीय महात्मा गांधी इस्पितळात शवविच्छेदन करून कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here