बोदवड चे गटविकास अधिकारी आर, ओ, वाघ विकास कामांच्या पाहणीच्या नावाखालीकागदोपत्री फिरस्ती दाखवून शासनाची, जनतेची दिशाभूल करीत आहे? जलचक्र बु येथील अंगणवाडी बांधकामातील प्रकार!

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर ,ओ, वाघ,हे तालुक्यातील विकासकामांच्या पाहणीच्या दैनंदिन फिरस्तीच्या नावाखाली कागदोपत्री फिरस्ती दाखवून शासनाची व जनतेची लोकप्रतिनिधी च्या संगनमतानेदिशाभूल करीत आहे,

याबाबत सविस्तर माहिती अशी की बोदवड तालुक्यात दोन ते तीन वर्षांपूर्वी जलचक्र बु!येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी चे काम मंजुरहोते ,ह्या अंगणवाडी चे रंगकाम,वीजपुरवठा, पाणीपुरवठा, इत्यादी कामे अपूर्ण असून अद्याप या अंगणवाडीत मुले बसत नाही,दि,19/06/2017रोजी जा, क्र, बांध,/मा ,आ,आर,आर, /170/2017 उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर यांचेकडील मिळलेयल्या माहितीवरून सदर चे काम पूर्ण करण्यात आले आहे

बोदवड तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेची अनेक कामे ही जुन्या कामावर काम दाखवून केली आहे, दलित वस्तीचे शौचालय हे अतिक्रमण जागेत बांधकाम केले आहेत, स्वच्छ भारत मिशनच्या कामात गैर प्रकार आहेत, जनतेच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले जात आहे, दोन वर्षांपूर्वी च्या तक्रारी प्रलंबित आहेत,

गटविकास अधिकारी दार महिन्याला ग्राम सेवकांच्या मासिक सभा घेतात,स्वतः तालुकभर फिरस्ती करतात,त्यांना जुन्याकामावर नवे काम केल्याचे दिसत नाही का?अतिक्रमण जागेत बांधलेले दलित वस्ती सुधार योजनेचे शौचालय दिसले नाही का?

सभापती, उपसभापती, हे सुध्दा सकाळी आठ वाजले पासून ते रात्री आठ ,नऊ वाजेपर्यंत फिरस्ती दाखवितात,विकास कामांची पाहणी करतात,त्यांना हे अपूर्ण कामे दिसत नाही का?गण, गटाचे चौकीदार यांना हि अपूर्ण कामे दिसत नाही, का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

पदाधिकारी ठेकेदारीत मग्न आहेत, ही कागदोपत्री फिरस्ती पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने तर होत नाही असे म्हटले तर चुकी चे ठरणार नाही, गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती जर खरोखर फिरस्ती करीत असतील तर त्यांनी ज्या गावात भेट पाहणी केली

त्या गावाच्या सरपंच,ग्रामसेवक,व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ सोबत सेल्फी काढून व्हायरल करावे म्हणजे पारदर्शकता दिसून येईल,कागदोपत्री विकास कामे करण्यास वाव मिळणार नाही,गैर प्रकार थांबतील अशी जागृत नागरिकांकडून बोलले जाते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here