बोदवड तहसीलदार यांनी बजावली शेलवड च्या ग्रामसेवकाला नोटीस, ४८ तासाचे आत मागितला खुलासा…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

शेलवड येथील गट क्र 166 वरील दि 23 सप्टेंबर रोजी अनधिकृतपणे खोदकाम बाबत तलाठी सजा शेलवड मंगेश पारिषेयांनी रीतसर पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांना सादर केला,

या अहवालाची तहसीलदार हेमंत पाटील यांनी दखल घेऊन शेलवड ग्राम पंचायत तीचे ग्राम सेवक यांना नोटीस बजावली असून 48 तासाचे आत खुलासा मागविला आहे,याबाबत माहिती अशी की,

शेलवड येथील ग्राम पंचायत शेलवड नावे असलेल्या गट क्र 166 वरील दि 23 /09/2020रोजी अनाधिकृत पणे खोदकाम चालू असताना परवानगी व इतर चौकशी केली असता विशाल शामराव नरवाडे याने नमुना न 8 अ वर शामराव भिकारी नरवाडे दाखल झाल्याचे दिसून येते,

शासन निर्णय क्र, जमीन 03/2011 प्र क्र,53 /ज — 1 –मंत्रालय मुंबई दि 12 जुलै 2011नुसार मा,सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे आदेशानुसार गायरान /गुरचरण जमीन देता येत नसल्याचे निर्देश आहेत,

सदर ची जमीन संबंधितास देऊन आपण मा,सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला असून यास्तव आपलेवर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असे नोटीसीत म्हटले आहे, या बाबत लेखी खुलासा माझें समक्ष पत्र 48 तासाचे आत सादर करावा,

खुलासा तात्काळ न आल्यास मा,न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी कार्यवाही प्रस्तावित करणेत येईल,याची नोंद घ्यावी, असे तहसीलदार हेमंत भागवत पाटील। यांनी ग्राम सेवक ग्राम पंचायत शेलवड व माहिती स्तव गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांना नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here